मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार १५ कोटी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना १५ कोटी रूपये पगार आहे. मुकेश अंबानी यांनी सलग सातव्या वर्षी, आपला कमाल वार्षिक पगार १५ कोटी रुपये एवढा कायम ठेवला आहे. 

Updated: May 21, 2015, 04:24 PM IST
मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार १५ कोटी title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना १५ कोटी रूपये पगार आहे. मुकेश अंबानी यांनी सलग सातव्या वर्षी, आपला कमाल वार्षिक पगार १५ कोटी रुपये एवढा कायम ठेवला आहे. 

मात्र रिलायन्सच्या इतर संचालकांच्या वेतनश्रेणीत थोडीशी घट करण्यात आली आहे.

भारतातील सर्वाधिक श्रीमंत असणार्‍या मुकेश अंबानी यांनी २००८-०९ पासून कमाल वार्षिक पगार १५ कोटी रुपये कायम ठेवला आहे. यामुळे अंबानी वर्षाला २४ कोटी रुपये कमी घेत आहेत. 

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची वेतनश्रेणी १५ कोटी रुपये कायम ठेवण्यात आली आहे. परंतु यासाठी वार्षिक ३८.८६ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ने ३१ मार्चला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. 

अंबानी यांनी त्यांच्या इच्छेनुसार व्यवस्थापन पातळीवर वैयक्तिक वेतन कमी असावे यासाठी उदाहरण घालून दिले आहे. 

वेतनावरुन ऑक्टोबर २००९ मध्ये वाद सुरू असताना अंबानी यांनी स्वेच्छेने १५ कोटी वेतनश्रेणी मर्यादित करण्याचा निर्णय घेतला होता. 

यादरम्यान कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद यांचे वार्षिक वेतन ६.०३ कोटी रुपये आहे. तर त्याचवर्षी रिफायनरीचे प्रमुख पवन कुमार कपिल यांचे वेतन २.४९ कोटी रुपयांवरून २.४१ कोटी रुपये करण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.