मुंबई : कडक उन्हाळ्यामुळं सध्या सगळ्यांची काहिली होत असून, हा त्रास आणखी काही दिवस असाच सोसावा लागणाराय...
पुढचे दोन दिवस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भात देखील उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
विदर्भातील अकोला तालुक्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस एवढ्या कमाला तापमानाची नोंद झाली.
ब्रम्हपुरी, परभणी, नांदेड, वर्धा, अहमदनगर, जळगाव आणि मालेगावमध्येही पारा 43 अंशावर होता.
राज्यातील विविध शहरातील अधितम तापमान
हरनाई - ३३.०
कोल्हापूर - ३९.४
मुंबई - कुलाबा - ३५.२०
मुंबई - सांताक्रुझ - ३४.२
महाबळेश्वर - ३५.९
नाशिक - ४०.९
परभणी ४३.१
पुणे - ४०.१
रत्नागिरी - ३२.६
सांगली - ४०.४
सातारा - ४०.१
सोलापूर - ४२.२
गोवा (पणजी) - ३३.७
अकोला - ४४.१
अमरावती - ४१.६
बुलढाणा - ४०.६
ब्रम्हपुरी ४३.९
चंद्रपूर - ४२.९
गोंदिया - ४२.६
नागपूर - ४२.८
वाशिम - ४०.८
वर्धा - ४३.५
यवतमाळ - ४२.५
नगर - ४३.२
अलीबाग - ३५.८
जळगाव - ४३.२
मालेगाव - ४३.२
नांदेड - ४३.०
उस्मानाबाद - ४१.३