मुंबई : आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढा त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचं नाव एका सर्वेत मोस्ट हेटेड इंडियन इन २०१५ मध्ये पहिल्या क्रमांकावर आलं आहे.
नकारात्मक गोष्टींवर ही माहिती समोर आली असली, तरी आपले जेवढे फॅन्स असतात, त्या खालोखाल तिरस्कार करणारेही असतात हे समोर आलं आहे.
द गुंज इंडिया इंडेक्स २०१५ : यात अरविंद केजरीवाल मोस्ट हेटेड इंडियन्समध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष देखील २०१५ चा मोस्ट हेटेड पक्ष असल्याचं मत या सर्वेत देण्यात आलं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मोस्ट हेटेड ठरले आहेत, काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेता आमीर खान.
या टॉप टेन लिस्टमध्ये टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी, यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अभिनेता शाहरूख खान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, हार्दिक पटेल आणि यो यो हनी सिंगचाही समावेश आहे.
हा डाटा गुगल सर्च, ट्वीटर मेन्शन आणि फेसबुक पेजवरील माहितीवरून मिळाली आहे, यू-ट्यूब सर्चचा देखील यात समावेश आहे. झी डिजिटलचे पार्टनर गुंज लॅबसोबत येऊन ही माहिती घेतली आहे.