भगत ताराचंद १०० वर्षापेक्षा जुनं हॉटेल

भगत  ताराचंद ११५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील कराचीत सुरू झालं होतं, साधारण १८९५ मध्ये भगत ताराचंदची सुरूवात झाली होती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2017, 03:21 PM IST

मुंबई : घरासारखं जेवणं भगत ताराचंदमध्ये मिळत असल्याने, मुंबईतल्या झवेरी बाजारसारख्या व्यापारी लोकांच्या भागात भगत ताराचंद लोकप्रिय आहे, भगत ताराचंदमध्ये व्हेज जेवण मिळतं,

भगत  ताराचंद ११५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील कराचीत सुरू झालं होतं, साधारण १८९५ मध्ये भगत ताराचंदची सुरूवात झाली होती. 

यानंतर भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर भगत ताराचंदचे मालकही मुंबईत आले, त्यांनी १९४८ साली भगत ताराचंद सुरू झालं, लहानशा जागेत भगत ताराचंद सुरू झालं.

सुरूवातीला मर्यादीत पदार्थ मिळत होते, पण यानंतर ते वाढवण्यात आले. ताजे, स्वादिष्ट आणि घरासारखे जेवण भगत ताराचंदमध्ये मिळते. बिअरच्या बाटलीत येथे ताक मिळते, या ताकला कच्छी बिअर असं ग्राहकांनीच नाव दिलं आहे.