दीपक भातुसे/अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : अखेर आज चौथ्या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेतील कामकाज सुरूळीत सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्यामुळं नंतर एकाकी पडलेल्या काँग्रेसनंही विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत विरोधी पक्षानं दोन्ही सभागृहात ठराव मांडलाय. मुख्यमंत्री या ठरावावर उत्तर देणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आपली पुढील भूमिका ठरवणार आहे.
मुंबई: काँग्रेस विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार
- शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत विरोधी पक्षाचा ठराव
- विरोधी पक्षाचा ठराव असल्याने काँग्रेस चर्चेत होणार सहभागी
- चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर काँग्रेस ठरवणार पुढील भूमिका
मुंबई: कर्जमाफीच्या विधानाबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- कर्जमाफी दिली जाणार नाही असं मी म्हटलं नाही
- कर्जमाफी हा एकमेव पर्याय नाही असं मी म्हटलं होतं
- मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवशीही गदारोळ कायम आहे. पण विरोधकांमध्ये आज फूट पडलीय.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर वरून काँग्रेसची घोषणाबाजी करून सभात्याग केलाय...पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आज विधीमंडळाच्या कामात सहभागी होताना दिसतेय. गोंदियातल्या जिल्हापरिषद निवडणूकीत काँग्रेसनं दगा दिल्याची भावना राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळेच आंदोलनातून राष्ट्रवादीनं माघार घेतलीय.
मधू चव्हाण अडचणीत
भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण अडचणीत सापडलेत. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या चर्चेचा मधु चव्हाण यांनी एका चॅनलवरील कार्यक्रमात उल्लेख केला होता. हा उल्लेख खोटा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. आंदोलन मागे घेण्यासाठी विरोधकांनी सत्ताधा-यांबरोबर साटेलोटे केल्याचं चव्हाण यांनी म्हटलं होतं. अध्यक्षांच्या दालनात तशी चर्चा झाल्याचा दावा, चव्हाण यांनी केला होता. मात्र अशी चर्चा झाली नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय. संसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनीही अशी चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. मधु चव्हाण यांना पक्ष समज देणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.