www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांचे डोळे लागलेल्या ‘मोनोरेल’च्या उद्घाटन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलंय. आता मोनोरेलच्या उद्घाटनासाठी १५ सप्टेंबरचा मुहूर्त मिळालाय. यादिवशी मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच चेंबूर ते वडाळा हा मार्ग सुरू होणार आहे.
मोनोरेलच्या सातही स्टेशन्सची कामं पूर्ण झाली आहे. चेंबूरपासून वडाळ्यापर्यंत चेंबूर, व्ही. एन. पुरव मार्ग, फर्टिलायझर वसाहत, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा डेपो अशी सात स्टेशन्स आहेत. चेंबूर ते वडाळा हा ८.८० किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर सहा स्तरीय सुरक्षा चाचण्याही सुरू झाल्या असून त्यांच्या अंतिम अहवालावर सिंगापूरच्या मास रॅपिड ट्रान्झिट अॅथॉरिटीचे (एसएमआरटी) शिक्कामोर्तब झाल्यावरच मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
चेंबूर ते वडाळा या टप्प्यावर रेल्वे सुरू झाल्यानंतर वडाळा ते जीटीबी नगर स्टेशनपर्यंतचा पट्टा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे आहे. म्हणूनच आता हा भागही ७५० व्होल्टने प्रभारित केला जाणार आहे. या भागातही विद्युत प्रवाह सुरू करण्यात आलाय. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांनी बीमपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.