मुंबई : देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा उत्साहात साजरा करणार आहे. 'माझी पाच मिनिटं, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या संकल्पनेअंतर्गत मुलुंडमधे मनसेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत.
भारतीय सैन्याच्या ताकदीची जाणीव नागरिकांना करुन देण्यासाठी विभागातील पक्षाच्या पदाधिका-यांनी एक लघुपट तयार केलाय. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून हा लघुपट मुलुंडमधे ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान नागरिकांना दाखविण्यात येणार आहे.
लघुपट दाखवल्या जाणाऱ्या मोबईल व्हॅनचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते आज उद्धघाटन झाले. मेहुल सर्कल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याची प्रतिकृतीही साकारली जात आहे.