मुंबई : राष्ट्रगीताच्या अवमान केल्याप्रकरणी आज एमआयएमविरोधात मनसेनं आंदोलन केलं.
दादरच्या शिवाजीपार्क जवळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी MIMचे झेंडे जाळले.
एमआयएमच्या नेत्यांनी याप्रकरणी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
एमआयएमचे आमदार इम्पियाज जलील यांनी चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. त्यावर मनसेनं आज आक्षेप नोंदवून आंदोलन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.