मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विदर्भवाद्यांकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषदेत धडक मारत राडा केला. ही पत्रकार परिषद उधळून लावली.
स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या अॅडव्होकेट वामनराव चटप आणि डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी पत्रकारपरिषदेचे आयोजन केले होते. ही पत्रकारपरिषद सुरू असताना मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वाखालील मनसेचे कार्यकर्ते सभागृहात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी सभागृहात दाखल होत अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.
या सर्व गोंधळामुळे पत्रकारपरिषद बंद पडली. हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळण्यात काहीही गैर नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, मनसेच्या राड्यानंतर काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.