मुंबई पालिकेत मनसेचे अनोखे आंदोलन

मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा खड्डयाच्या मुद्याने गाजली. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयाचा प्रश्न घेऊन मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनोखे आंदोलन केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 6, 2013, 11:53 AM IST

www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा खड्डयाच्या मुद्याने गाजली. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयाचा प्रश्न घेऊन मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनोखे आंदोलन केले.
काळ्या फिती लावून तसंच मानेला, कमरेला पट्टा लावून मनसे नगरसेवकांनी सभागृहात खड्डयावरुन प्रशासन आणि सत्ताधा-यांना धारेवर धरले. खड्डयांवर आयुक्तांनीच निवेदन करावे या मनसेच्या मागणीला काँग्रेस, एनसीपीबरोबरच सत्तेत सहभागी असणा-या भाजपनंही पाठिंबा दिला. त्यामुळं शिवसेना सभागृहात एकाकी ठरली.

शेवटी आयुक्त सभागृहात आल्यानंतर पुढील सभेत निवेदन करु. असे सांगितले परंतु विरोधकांनी निवेदन करण्याची मागणी करुन गोंधळ घातला. यात भाजपचे नगरसेवकही सामील झाले. या गोंधळातच महापौरांनी सभागृह तहकूब केले. सभागृह तहकूब करण्याच्या महापौरांच्या निर्णयावर भाजपनंही महापौरांवर टिकेची झोड उठवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.