मुंबई : शिवसेनेच्या प्रभाकर शिंदे यांना भाजपात घेतल्यामुळं भाजप आमदार तारासिंह नाराज झाले आहे.
वॉर्ड क्रमांक १०६ मधून शिंदेंना उमेदवारी दिली जाणार आहे. तर तारासिंह यांचा मुलगा राजनीत सिंह देखील याच वॉर्डमधून इच्छूक होते. त्यामुळे आता शिवसेनेचे प्रभाकर शिंदे यांना तिकीटाची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे तारासिंग जमीनीवर आले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर म्हटले जाते आहे की 'शिंदे' हमी पर, 'तारा' जमीं पर...
किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्याला तिकीट मिळत असेल तर मग माझ्या मुलाला का नाही, असा सवाल आमदार तारा सिंग यांनी केला आहे.