मुंबई : मुंबई शहरातील शिवाजीनगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. एका बापानं आपल्या पोटच्या १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.
या नराधम बापाला पोलिसांनी अटक केलीय. गेल्या तीन वर्षांपासून हा बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. काल दुपारी मुलीसोबत अतिप्रसंग केल्यानंतर ती ओरडत बाहेर आली आणि आपल्या मैत्रिणीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली.