MIMची मान्यता रद्द करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी

शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी MIMची मान्यता रद्द करावी मागणी केली. MIMचेनेते ISISशी संबंधित तरुणांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे.

Updated: Jul 22, 2016, 03:58 PM IST
MIMची मान्यता रद्द करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी title=

मुंबई : शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी MIMची मान्यता रद्द करावी मागणी केली. MIMचेनेते ISISशी संबंधित तरुणांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसात परभणीतून एका संशियत दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरात बॉ़म्ब बनव्याचं साहित्य जप्त झालं.  या अटकेनंतर एमआयएमच्या नेत्यांनी युवकांना भडकावून घोषणाबाजी दिल्या.  देशविरोधी कारवायांना MIM पाठिबा देत असल्याचा आरोप यावेळी राहुल पाटील यांनी केला. 

मराठवाड्यातून १०० हून अधिक युवक फरार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राहुल पाटील यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. मात्र एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. आयसिसच्या विरोधात आवाज उठवणारी एमआयएमही पहिली पार्टी असल्याचं ते म्हणाले