www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी... म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत. त्यातच घरांच्या किंमती कमी करण्याचं सोडून आता म्हाडानं उत्पन्न गटाच्या मर्यादेत बदल करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी वेतनमर्यादा यापूर्वी आठ हजार रुपये एवढी होती. नवीन निकषांनुसार आता ती दुप्पट करत १६,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय
अल्प उत्पन्न गटाची मर्यादा आठ ते वीस हजारांवरून ती आता १६,००० ते ३१,००० एवढी केलीय.
मध्यम उत्पन्न गटासाठी या आधीची मर्यादा २०,००० ते ४०,००० एवढी होती ती आता रुपये ३१,००० ते ६२,००० वर नेण्यात आलीय.
उच्च उत्पन्न गटासाठी यापूर्वी चाळीस हजारांपेक्षा जास्त उत्पन्नाची मर्यादा होती ती आता ६२ हजारांपेक्षा जास्त करण्यात केलीय.
या आधीच्या वेतन मर्यादेमुळे लॉटरी विजेत्यांना कर्ज मिळणे कठिण झाले होते. तेव्हा नवीन वेतन मर्यादेमुळे कर्ज मिळणे सोपं होणार असल्याचं म्हाडाचं म्हणणं आहे. या नवीन बदलांवर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या म्हाडा बोर्डाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. मात्र म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.