www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
म्हाडानं यंदा आपल्या घरांच्या किंमतीत रेकॉर्ड करण्याचं ठरवलेलं दिसतंय. येत्या दोन दिवसांत म्हडाच्या तब्बल ८७८ घरांसाठी लॉटरी जाहीर होणार आहे. पण, `सामान्यांसाठी` म्हणून घरं निर्माण करणाऱ्या म्हाडानं यंदा मात्र सामान्यांना लांबच ठेवणं पसंत केलंय.
कोकण मंडळाच्या १८०८ घरांसह मुंबईतील ८७६ घरांच्या लॉटरीची जाहिरात येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. या घरांची किंमत गुरुवारी निश्चित केली गेलीय. यामध्ये दहिसर इथल्या शैलेंद्रनगर इथल्या ८७१ चौरस फुटांच्या घरासाठी म्हाडानं तब्बल ९५ लाख रुपयांची किंमत निश्चित केलीय, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजनकुमार सुधांशू यांनी दिलीय.
२०१३ च्या लॉटरीत पवई, तुंगा येथील घरे सर्वात मोठी आणि महागडी होती. हा विक्रम म्हाडानं यंदा मोडीत काढलाय.
सोडतीबाबात महत्त्वाच्या गोष्टी
* जाहीरात प्रसिद्धी - २४ किंवा २५ फेब्रुवारी
* अर्ज विक्री - २४ एप्रिल ते १५ मे
* अर्ज स्वीकारण्याची मुदत - २४ एप्रिल ते १६ मेपर्यंत अॅक्सिस बँकेत स्वीकारणार
* नोंदणी शुल्क - २०० रुपये
विभाग, घरे, उत्पन्न गट, क्षेत्रफळ, किंमत
* मानखुर्द - २३९ - अत्यल्प - २६९ चौ. फूट - ५ लाख ७५ हजार
* कुर्ला - २०७ - अत्यल्प - २६९चौ. फूट - १५ लाख
* प्रतीक्षानगर - ५६ - मध्यम गट - ४३७ चौ.फूट - किंमत निश्चित होणे बाकी
* मागाठाणे - ६२ - अत्यल्प गट - २६९ चौ. फूट - १५ लाख ६२ हजार
* शैलेंद्रनगर - ८६ - उच्च गट - ८७१ चौ. फूट - ९५ लाख
* सांताक्रुझ - ५१ - उच्च गट - ७३९ चौ. फूट - ७४ लाख
* तुंगा पवई - ९ - अल्प गट - ३०५ चौ. फूट - ४८ लाख ८६ हजार
* तुंगा पवई - १०८ - उच्च गट - ४७६ चौ. फूट - ७५ लाख २२ हजार
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.