www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मेट्रो कारडेपोची पाहणी करून सकाळी सुमारे दहाच्या सुमारास मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवणार. वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या पहिल्या मेट्रोच्या मार्गावर आज चाचणी केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात वर्सोवा कारडेपो ते आझाद नगर स्टेशन या अंतरासाठी चाचणी घेण्यात आली होती.
जानेवारी २००८मध्ये या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले ते मार्च २०१३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ती मुदत उलटून गेली असून येत्या ऑगस्ट ११ किमींपैकी प्रथम वर्सोवा ते एअरपोर्ट रोड स्टेशन हा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. तर एअरपोर्ट रोड ते घाटकोपर या मार्गावरील वाहतूक येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याची एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो वन कंपनी यांची योजना आहे.