मुंबई : गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मेट्रोप्रमाणे सीट असलेल्या रेल्वे पुढील दोन महिन्यांत सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नकाते या तरुणाला गर्दीमुळे लोकल प्रवासादरम्यान जीव गमवावा लागला. त्यानंतरही अशाच या घटनेनंतर सर्वच स्तरातून रेल्वे प्रशासनावर टीका झाली. या प्रकरणाची दखल घेताना रेल्वे प्रशासनाने मध्ये रेल्वेमार्गावर फेब्रुवारीपर्यंत मेट्रोप्रमाणे सीट असलेल्या रेल्वे सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतची माहिती दिलीय.
मध्य रेल्वेवर या रेल्वेच्या आठ नव्या फेऱ्या असतील तर हार्बर मार्गावरही इतक्याच फेऱ्या धावतील. ठाणे ते नवी मुंबईला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावर या ट्रे्नच्या २० फेऱ्या होतील.
या वर्षी नोव्हेंबरपर्यंत गर्दीमुळे लोकलमधून पडून तब्बल ६७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापैकी मध्य रेल्वेमार्गावरील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५३ इतकी आहे.
तसेच जलद मार्गावरील गाड्यांना अनेक थांबे देण्याबाबतचाही विचार सुरु आहे. सध्या कल्याण ते सीएसटीदरम्यानची लोकल डोंबिवली, ठाणे, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबते. यात आता विक्रोळी आणि परेल या स्थानकांचाही समावेश कऱण्याबाबत विचार सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.