रतन टाटांच्या नॅनोने रूपडं बदललं

रतन टाटांच्या नॅनोचं आता रूपडं बदलणार आहे, तसेच आता लाख रूपयात ही कार मिळणार नाहीय, त्यामुळे नॅनोला आता स्वस्त कारही म्हणता येणार नाहीय, टाटा कंपनी 'जेनएक्स नॅनो' नावाने हे मॉडेल बाजारात उतरवणार आहे.

Updated: May 4, 2015, 10:48 AM IST
रतन टाटांच्या नॅनोने रूपडं बदललं title=

पुणे : रतन टाटांच्या नॅनोचं आता रूपडं बदलणार आहे, तसेच आता लाख रूपयात ही कार मिळणार नाहीय, त्यामुळे नॅनोला आता स्वस्त कारही म्हणता येणार नाहीय, टाटा कंपनी 'जेनएक्स नॅनो' नावाने हे मॉडेल बाजारात उतरवणार आहे.

सर्वात स्वस्त कारचा टॅग आपोआप हटणार आहे, कारण कंपनी नव्या मॉडेलमध्ये अनेक फीचर्सची भर करणार आहे. 
 
स्वस्त कार म्हणून २००९ मध्ये नॅनोला सर्वात लॉन्च करण्यात आलं होतं. सामान्यांचं स्वत:ची कार घेण्याचं स्वप्न नॅनोमुळे पूर्ण झालं होतं. संपूर्ण जगाचं लक्ष अवघ्या एक लाख रुपयांमध्ये मिळणाऱ्या या कारकडे गेलं होतं.
  
'जेनएक्स नॅनो'मध्ये ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन, ओपनेबल बूट तसंच ब्लूटूथ फोन सिंक ऑडिओ  शिवाय इतरही काही फीचर्सचा समावेश असतील.

 'जेनएक्स नॅनो' येत्या सहा ते सात आठवड्यांमध्ये बाजारात येईल. यानंतर नॅनो सीरिजमधील सध्या उपलब्ध असलेले व्हर्जन बाजारातून हळूहळू हटवले जातील.
 
परंतु, नॅनोचं फक्त सीएनजी व्हर्जन कायम ठेवलं जाईल. नॅनो ब्रॅण्ड संपुष्टात येणार असल्याच्या चर्चांवर टाटा मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी पदडा पाडला. नॅनो हे कंपनीचं अत्यंत महत्त्वाचं उत्पादन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.