कुर्ला येथे यांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेचा खोळंबा

मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी ६.२० वाजण्याच्या दरम्यान कुर्ला येथे यांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा त्रास सहन करावा लागला. अप मार्गावरील जलद वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली.

Updated: Apr 9, 2015, 01:01 PM IST
कुर्ला येथे यांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेचा खोळंबा title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी ६.२० वाजण्याच्या दरम्यान कुर्ला येथे यांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा त्रास सहन करावा लागला. अप मार्गावरील जलद वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली.

दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. या बिघाडामुळे रेल्वे गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. जलद ट्रॅकवरील गाड्या धिम्या ट्रॅकवर वळवण्यात आल्या होत्या. माटुंगा ते विक्रोळी दरम्यान, जलद वाहतूक धिम्या मार्गावर चालविण्यात आली.

सकाळच्या वेळेस झालेल्या या बिघाडामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल झालेत. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.