'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग'

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Updated: Feb 5, 2017, 07:53 PM IST
'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग' title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शेलार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. आशीष शेलार यांनी केलेला हा विनोद आहे.लोकांच्या डोळ्या मधे धूळफेक करण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी केल आहे.यांच्या मधेच फ्रेंडली मैच चालू आहे.निवडणुका नंतर हे एकत्र येतील.