www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात दूरध्वनी चालक (Telephone Operator) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सरळ सेवेने करण्यात येणार आहे. गट-क संवर्गातील दूरध्वनी चालक पदासाठी सहा जागा रिक्त आहेत.
दूरध्वनी चालक पदासाठी (वेतनश्रेणी रू. ५२००-२०२००+ ग्रेड वेतन रू. २००० अधिक शासन नियमानुसार मिळणारे इतर भत्ते) या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून लेखी परीक्षेसाठी निर्धारित नमुन्यात या जाहिरातीद्वारे दि. ३०.०४.२०१३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शासनमान्य संस्थेचे दूरध्वनी चालक विषय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या ज्ञानासह अस्खलित संभाषण आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञानही आवश्यक आहे. ३३ वर्षापर्यंतची अट आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक कॉपी करून नवीन टॅबमध्ये पेस्ट करा - http://goo.gl/LAa1r