पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विरारमध्ये एका ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 

Updated: Apr 29, 2016, 09:12 AM IST
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या title=

मुंबई : पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विरारमध्ये एका ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 

संतोष गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे. २२ एप्रिल रोजी त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी संतोष यांच्या आईने सुनेविरोधात आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केलीये. यात आपल्या सुनेचं २०१४ पासून अफेयर सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.

जेव्हा संतोष यांना आपल्या पत्नीचे दुसऱ्या माणसासोबत अफेयर असल्याचे समजले तेव्हा त्यांनी पत्नीला विरोध केला. त्यावेळी पत्नी त्यांचे घर सोडून गेली मात्र तिने पतीचा छळ सुरु केला. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संतोषची पत्नी तिचे आणि तिच्या प्रियकराचे आक्षेपार्ह फोटो पतीला पाठवत असे. तसेच पैशासाठी ती संतोष यांना त्रास देत होती.

संतोष यांच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, माझ्या मुलाचा मानसिक छळ केला जात होता. हा छळ सहन न झाल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.