मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी : मुख्यमंत्री

मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. दारूकांडात आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आरोपींना कठोरातली कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

Updated: Jun 23, 2015, 04:57 PM IST
मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी : मुख्यमंत्री title=

मुंबई : मालवणी दारूकांडातल्या सर्व आरोपींना फाशी व्हावी यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. दारूकांडात आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. त्यामुळे आरोपींना कठोरातली कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

मुख्यमंत्र्यांनी या संबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केलीय. आरोपींना फाशी होण्याच्या दृष्टीनेच खटला उभा केला जाईल असं त्यांनी सांगितलंय.  दरम्यान मालवणी दारूकांड प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. 
 
मालाड मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी १०२ बळी गेल्यानंतर, राज्य सरकारला जाग आलीय. याप्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. ही समिती चौकशी करून आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

दरम्यान, विषारी दारूकांडावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला चांगलंच फटकारलंय. सरकारचा अंकुश नसल्यानं अवैध धंद्यांचं पेव फुटलंय, असा भडीमार राज ठाकरे यांनी केला. तर सरकारनं कडक भूमिका न घेतल्यानं हातभट्ट्या वाढल्यात. याप्रकरणी ३०२ चा गुन्हा कुणाविरूद्ध दाखल करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.