आता सावर्जनिक ठिकाणी थुंकाल तर...

सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात. कोणाची तमा न बाळता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आता लगाम बसणार आहे. कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याचा विचारात असून तशा हालचाली सुरु केल्यात.

Updated: Oct 16, 2015, 08:32 AM IST
आता सावर्जनिक ठिकाणी थुंकाल तर... title=

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात. कोणाची तमा न बाळता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आता लगाम बसणार आहे. कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याचा विचारात असून तशा हालचाली सुरु केल्यात.

राज्य सरकारच्या हालचाली, छाननी समिती कायदा करण्यासाठी कार्यरत आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच भिंती पाहल्यावर थुंकल्याने रंगल्याचे चित्र दिसून येते. शासकीय रुग्णालयांतही जवळपास सर्व भिंती पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांनी रंगविलेल्या दिसतात. याविरोधात कठोर कारवाई करणारा कायदा सरकार तयार करीत आहे. यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासण्यासाठी छाननी समितीची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली.

हा कायदा कडक करण्यात येणार आहे. कायद्यात कोणत्याही पळवाटा राहू नयेत, यासाठी छाननी समितीच्या माध्यमातून सर्व बाबींची तपासणी होत आहे. मंत्रालयातील या बैठकीला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

थुंकण्यास प्रतिबंध करण्यासाठी ‘महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंधक अधिनियम २०१५’ तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत दंडाची व्याप्ती, आकारणीचे अधिकार कोणाला द्यायचे, यावर मंत्रालयात बैठकीत चर्चा झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.