महाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?

हरयाणासह महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा जाहीर करताच, राजकीय पक्षांप्रमाणेच सट्टेबाजारातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हरयाणापेक्षाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची उत्सुकता सट्टेबाजांनाही आहे. 

Updated: Sep 14, 2014, 06:30 PM IST
महाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय? title=

मुंबई : हरयाणासह महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा जाहीर करताच, राजकीय पक्षांप्रमाणेच सट्टेबाजारातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हरयाणापेक्षाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची उत्सुकता सट्टेबाजांनाही आहे. 

यावर्षी महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर तब्बल 300 ते 400 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांसह चार राज्यातल्या पोटनिवडणुकीत सट्टेबाजांचे अंदाज जवळपास अचूक ठरले होते..

हे लक्षात घेण्यासारखी बाब
288 सीट्स...
3500 पेक्षा जास्त उमेदवार
300,00,00,00,000 (300 कोटींचा) सट्टा

 
निवडणूक आयागोनं निवडणुकांची घोषणा केल्यावर राजकीय पक्षांनी बिगूल फुंकलंय तसंच सट्टेबाजारानंही शंखनाद करायला सुरूवात केलीय. उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटकातल्या पोटनिवडणुकात सट्टेबाजांचे अंदाज जवळपास अचूक होते. 

त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी पंटर्स सज्ज झालेत. राज्यात सरकार कोणाचं स्थापन होणार इथपासून कोणाला किती मतं मिळणार ते मुख्यमंत्री कोण होणार इथपर्यंत सट्टेबाजारात बोली लागल्या आहेत. 
 
महाराष्ट्रात कोणाचं सरकार?
 
महायुती- 35 पैसे
आघाडी- 75 पैसे

 
महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा- 50 पैसे
आघाडीला 100 पेक्षा जास्त जागा- 90 पैसे
मनसेला 15 पेक्षा जास्त जागा- दीड रूपया
अपक्षांना 10 पेक्षा जास्त जागा- 2 रूपये

 
हे आकडे लक्षात घेता राज्यात मोदी लाट कायम असल्याचा इशारा सट्टेबाज देत आहेत. तसंच मनसेचा परफॉर्मन्सही गेल्यावेळपेक्षा सुधारण्याऐवजी खालावण्याचा कल दिसतोय. 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी सट्टेबाजांची पहिली पसंती उद्धव ठाकरे यांना आहे तर अखेरच्या क्रमांकावर आहेत राज ठाकरे
 
उद्धव ठाकरे- 25 पैसे
नितीन गडकरी- 45 पैसे
देवेंद्र फडणवीस- 80 पैसे
पृथ्वीराज चव्हाण- 3 रूपये
राज ठाकरे- 5 रूपये
 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी सट्टेबाजांची पहिली बोली असली तरी उद्धव ठाकरे मात्र या पदासाठी फारसे उत्सुक नाहीत. 300 कोटींचा सट्टा लावलेल्या सट्टेबाजांनी वर्तवलेली ही भविष्य़वाणी आता कितपत खरी होते हे आता अवघ्या महिन्याभरात सिद्ध होईलच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.