मुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस

महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.

Updated: Oct 18, 2016, 08:09 PM IST
मुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस title=

मुंबई : महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.

गोवा सरकारने देखील अशीच एक वाहनसेवा सुरु केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. एमटीडीसीकडून ही सेवा दिली जाणार आहे तर जेएनपीटीकडे याचे संपूर्ण अधिकार असणार आहेत.

गिरगाव चौपाटीवर अशा प्रकारच्या बसेस सुरु करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल नियामक प्राधिकरणाकडे परवानगी मागण्यात आली आहे. समुद्रातून जमिनीवर येण्यासाठी किनाऱ्यावर एक फ्लोटींग जेट्टी उभारावी लागणार आहे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे.

तीन कोटीहून अधिकचा यासाठी खर्च येणार आहे. गिरगाव किनाऱ्यापासून या सेवेची सुरुवात होणार आहे.