मुंबई : कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्याप्रकरणात राज्य सरकारने या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यावर कारवाई केली आहे. सहाय्य यांच्याकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांना दुसरीकडे कुठेही नियुक्ती दिली जाणार नाही.
बी. के. जैन यांच्याकडे सध्या कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील आठवड्यात कृषी खात्याचे सहसचिव राजेंद्र घाटगे यांच्या मुलाने घाटगे यांना फोन करून घरी या अन्यथा मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. घाटगे यांनी सहाय यांच्याकडे लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र सहाय यांनी ती परवानगी नाकारली होती.
घाटगे घरी पोहचू न शकल्याने त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. या प्रकारामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सहाय्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. याबाबत काल आंदोलनही केले होते आणि निषेध व्यक्त केला होता. याप्रकरणानंतर सरकारने गंभीर दखल घेत ही कारवाई केली.