म्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी

तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.

Updated: Sep 8, 2015, 10:07 AM IST
म्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी title=

मुंबई : तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.

विरार येथील इमारतींचे काम पूर्ण करण्याची हालचाल सुरु झाली आहे. मार्च २०१६पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. तर दुसरीकडे कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विरार बोळींज येथील घरांचे बांधकाम मार्चमध्ये पूर्ण होणार असल्याने जानेवारी महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.

दरम्यान, म्हाडाने जानेवारी महिन्यात मुंबईत लॉटरी काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबई मंडळाकडे घरेच उपलब्ध नसल्याने यंदा लॉटरीमध्ये मुंबईतील घरांचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे.

मुंबई मंडळाने बोरीवली येथे आर आर मंडळासाठी उभारलेली सुमारे दीड हजार घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्याला गृहनिर्माण विभागाकडून अद्याप ग्रीन सिंग्नल मिळालेला नाही. गृहनिर्माण विभागाने बोरीवली येथील घरांची लॉटरी काढण्यास मंजुरी दिल्यास मुंबई मंडळाचीही लॉटरी निघू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.