मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणात सोमवारचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. डीएनए रिपोर्टनुसार इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई असल्याचं स्पष्ट झालंय.
मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषद घेतली. मारिया म्हणाले, डीएनए रिपोर्टमधून हे स्पष्ट होतंय आरोपी इंद्राणी मुखर्जी मृत शीना बोराची बायोलॉजिकल आई आहे. मारिया यांनी सांगितलं, फॉरेन्सिक तज्ज्ञ, ऑडिटर, चार्टर्ड अकाउंटन्ट आणि आयटी सल्लागारांची आमची टीम मुखर्जीच्या भारत, स्पेन, ब्रिटनमधील विविध कंपन्या, गुंतवणूक आणि इतर संपत्तीचा अभ्यास करत आहे. पीटर मुखर्जीकडून अजूनही शीना बोरा हत्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. राकेश मारिया यांनी सांगितलं की, पोलिसांना शीना बोराच्या दागिन्यांचा एक तुकडा सुद्धा घटनास्थळावरून सापडलाय.
आणखी वाचा - शीना बोरा हत्याप्रकरणाचं 'आरुषी' होऊ देणार नाही - राकेश मारिया
इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय याला कोर्टानं दोन आठवड्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. तर संजीव खन्नाला कोलकाता कोर्टात हजर होण्यासाठी नेलंय.
इंद्राणी मुखर्जीला कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. तिची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आलीय.
आणखी वाचा - शीनाला मारण्याचं एक कारण असेल तर सांगू ना - इंद्राणी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.