मुंबई : येत्या मे -जून महिन्यात म्हाडातर्फे मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण ४४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
यात अपंग प्रवर्गातील एकूण ६६ सदनिकांची स्वतंत्र लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबईतील ७८५ सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
यात अत्यल्प उत्पन्न गटातील गोरेगाव १८२, मानखुर्द ६६, अल्प उत्पन्न गटातील मालवणी मालाड येथील २३२ आणि मध्य उत्पन्न गटातील मुलुंड (गवाणपाडा) 249, तर सायन प्रतिक्षानगर येथील ५६ सदनिकांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.