डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. ही लोकल सीएसटीहून -टिटवाळ्याला जात असतांना ही घटना घडली. 

Updated: Sep 30, 2014, 12:33 PM IST
डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. ही लोकल सीएसटीहून -टिटवाळ्याला जात असतांना ही घटना घडली. 

या घटनेमुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती अजून मिळालेली नाही.

वाहतूक सुरळीत होण्यास किती वेळ लागेल याची माहिती अजून रेल्वेकडून मिळालेली नाही. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर लोकलचे डबे घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी सीएसटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.