भारतातील ३०० पेक्षा जास्त तरुण इसिससाठी इराकमध्ये - आरिफ

भारतातील ३०० पेक्षा जास्त मुस्लिम तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी इराकला गेल्याची माहिती एनआएच्या अटकेत असलेल्या आरिफ मजीदनं दिलीय. 

Updated: Nov 30, 2014, 04:11 PM IST
भारतातील ३०० पेक्षा जास्त तरुण इसिससाठी इराकमध्ये - आरिफ title=

मुंबई: भारतातील ३०० पेक्षा जास्त मुस्लिम तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी इराकला गेल्याची माहिती एनआएच्या अटकेत असलेल्या आरिफ मजीदनं दिलीय. 

आरिफ हा पुरोगामी विचारांचा आणि भ्रमनिरास झालेला तरुण आहे. एनआयए त्याला एक गुन्हेगार मानत नसल्याचं काही तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र आरिफला आपण केलेल्या कृत्त्याचा कुठलाही पश्चात्ताप झाला नसल्याचं एनआयएमधल्या सूत्रांनी झी मीडियाला सांगितलंय. 

आरिफ अजूनही तपासात सहकार्य करत नसून, अजूनही इसिसच्या संपर्कात असल्याची क़बुली त्यानं एनआयएला दिलीय. मात्र लवकरच आरिफद्वारे धक्कादायक माहिती हाती येणार असल्याचं एनआयएच्या एका बड्या अधिकाऱ्यानं झी मीडियाला सांगितलंय. 

आरिफ माजिद तपासात मोघम उत्तरं देत असल्यानं खरी माहिती काढण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याच्या ‘नार्को अॅनॅलीसिस’ आणि ‘लाय डिटेक्टर’ अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्या करण्याच्या विचारात आहे. यासाठी न्यायालयाकडे लवकरच औपचारिक अर्ज केला जाईल, असे सूत्रंनी सांगितले. आरिफला शनिवारी विशेष न्यायालयानं ८ डिसेंबर्पयत राष्ट्रीय तपास यंत्रणोच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.