पवईत आयआयटीत बिबट्याची होणार गटारी?

आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरल्याचे वृत्त समजताच अनेकांना धडकी बसली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. दरम्यान, भुकेलेल्या बिबट्याला चक्क कोंबड्या आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिबट्याची खऱ्या अर्थाने गटारी होणार असल्याची चर्चा आहे.

Updated: Jul 23, 2014, 11:41 PM IST
पवईत आयआयटीत बिबट्याची होणार गटारी? title=

मुंबई : आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरल्याचे वृत्त समजताच अनेकांना धडकी बसली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. दरम्यान, भुकेलेल्या बिबट्याला चक्क कोंबड्या आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिबट्याची खऱ्या अर्थाने गटारी होणार असल्याची चर्चा आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी कॅम्पसमध्ये बिबट्य़ा शिरला. याची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी, तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम आयआयटी पवई कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे. बिबट्या नक्की प्रयोगशाळेत किंवा कॅम्पसमध्ये कुठे लपून बसला आहे, याची कुठलीच माहिची उपलब्ध झालेली नाही. या बिबच्याचा शोध सुरू आहे.

कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या कॅम्पसमध्ये शिरल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली होती, असं वन अधिका-यांतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्री बिबट्या बाहेर पडेल, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांना आहे. भुकेलेल्या बिबट्याला कोंबड्या आणण्यात आल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.