महाराष्ट्र सदनातील सुविधांबाबत चौकशी : सीएम

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील उपाहारगृह आणि सोयी-सुविधासंदर्भात शिवसेना खासदारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

Updated: Jul 23, 2014, 06:43 PM IST
महाराष्ट्र सदनातील सुविधांबाबत चौकशी : सीएम title=

मुंबई : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील उपाहारगृह आणि सोयी-सुविधासंदर्भात शिवसेना खासदारांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.

शिवसेना खासदारांनी मंगळवारी उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाला चांगला दणका दिला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी टिका केली. लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून वस्तुस्थितीची माहिती घेतली. 

महाराष्ट्र सदन ही महाराष्ट्राची एक गौरवशाली वास्तू आहे. या सदनाचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट दर्जाचे असणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सदनातील उपाहारगृह तसेच इतर काही सुविधांबाबत लोकप्रतिनिधीनी आक्षेप नोंदविले आहेत. 

सदनातील उपाहारगृह चालविण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र तिला प्रतिसाद मिळाला नसल्याने हे कंत्राट ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीच्या सेवेबाबत आक्षेप असल्याने त्यांची सेवा बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.