वडाळ्यात दरड कोसळली; दोघे ठार, चार जखमी

वडाळ्याला अॅन्टॉप हील परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलीय. जुन्या पोस्ट ऑफीसच्या बाजूला देवरामदादा चाळीवर ही दरड कोसळल्याची माहिती आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 10, 2013, 11:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वडाळ्याला अॅन्टॉप हील परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलीय. जुन्या पोस्ट ऑफीसच्या बाजूला देवरामदादा चाळीवर ही दरड कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये दोन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर अजूनही चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. मंगळवार रात्रीपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास अॅपण्टॉप हिल परिसरात दरड कोसळली. माती आणि दगड तेथील चार-पाच झोपड्यांवर कोसळले. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत व बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन)चे जवानही मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.