मुंबईतला सर्वात मोठा बुकी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतला सर्वात मोठा बुकी शोभन मेहता मुंबई पोलिसांच्या हाती लागलाय. या अटकेमुळे बेटिंग प्रकरणात आणखी बड्या नावांचा पर्दाफाश होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 9, 2013, 05:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतला सर्वात मोठा बुकी शोभन मेहता मुंबई पोलिसांच्या हाती लागलाय. या अटकेमुळे बेटिंग प्रकरणात आणखी बड्या नावांचा पर्दाफाश होणार आहे. क्राईम ब्रांचनं या शोभन मेहताच्या मुसक्या आवळल्या आणि थेट मुंबईला आणलं.
एकेकाळी मुंबईत दीपा बारमध्ये तर्रनुमच्या छमछमवर बड्या हस्ती आपलं घरदार ओवाळून टाकायचे. तर्रनुम म्हणजे गुन्हेगार जगत आणि प्रतिष्ठीत व्यक्तींमधला दुवा.... त्याचाच फायदा घेत बुकी शोभन मेहता उर्फ कालाचौकीनं दीपा बारमध्ये येणा-या सिनेकलाकार, क्रिकेट प्लेअर आणि उद्योगपती यांना गळाला लावलं होतं.
२००४ साली मुंबई क्राईम ब्रांचनं बेटींग प्रकरणी बारगर्ल तर्रनुमला अटक केली होती. तेव्हा तर्रनुमच्या अटकेनंतर बेटींग प्रकरणात सिनेकलाकार, क्रिकेट प्लेअर आणि उद्योगपती यांच्यातील बेंटींगचे व्यवहार उघडकीस आले होते. तर्रनुमच्या सुंदरतेचा आणि तिचे सिनेकलाकार, क्रिकेट प्लेअर आणि उद्योगपति यांच्याशी असलेल्या संबंधाचा फ़ायदा घेऊन शोभन मेहतानं अनेक बड्या हस्तींना बेंटींगच्या जाळ्यात ओढलं होतं.
आयपीएल बेंटिंगप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केलेल्या रमेश व्यास या बुकीच्या संपर्कात शोभन होता. तेव्हापासून पोलीस शोभन मेहताच्या मागावर होते. अखेर गोव्यामध्ये शोभन पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आयपीएल प्रकरणात आतापर्यंत विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मय्यपन सारखी नाव समोर आलीयत. पण, शोभन मेहताच्या अटकेमुळे बेटिंगमधले आणखी बडे मासे समोर येण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.