कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प

मुंबईकरांच्या आठवड्याची सुरूवातच लोकलच्या त्रांगड्यानं होते. आज पहाटे चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कुर्ला-सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे तीन डबे घसरले आहेत. त्यामुळे कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

Updated: Feb 27, 2017, 08:34 AM IST
कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प title=

मुंबई : मुंबईकरांच्या आठवड्याची सुरूवातच लोकलच्या त्रांगड्यानं होते. आज पहाटे चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कुर्ला-सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे तीन डबे घसरले आहेत. त्यामुळे कुर्ला-सीएसटी हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

पनवेल आणि  नवी मुंबईच्या दिशेनं मुंबईकडे नोकरीसाठी निघालेल्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर कुर्ल्याहून सीएसटीला पोहचण्याची मुभा देण्यात आलीय. दरम्यान पनवेल-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर अतिरिक्त लोकल चालवण्यात येत असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.