मुंबई: गणपती बाप्पा सध्या विराजमान आहेत. संपूर्ण वातावरण मंगलमय झालंय. प्रसिद्ध गणपती मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते.
आणखी वाचा - लालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...
मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात. फक्त मुंबईतीलच नाही देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात.
जाणून घ्या मुंबईत आल्यावर लालबागच्या राजाला कसं पोहोचायचं...
- जर तुम्ही वेस्टर्न लाईननं प्रवास करत असाल तर लोअर परेल स्टेशनला उतरावं लागेल, तिथून चालत 10-15 मिनीटांचं अंतर लालबागच्या राजाला पोहोचाल किंवा आपण टॅक्सीही करू शकता.
- जर तुम्ही सेंट्रल लाइन (मध्य रेल्वेनं) प्रवास करत असाल तर तुम्हाला करी रोड किंवा चिंचपोकळी स्टेशनला उतरावं लागेल. करी रोडपासून लालबाग 10-15 मिनीटांचं अंतर चालत तर चिंचपोकळी पासून अवघ्या 2 मिनीटांच्या अंतरावर आहे लालबागचा राजा...
- जर आपण नवी मुंबईतून किंवा हार्बर लाईननं प्रवास करत असाल तर कुर्ला किंवा सँडहर्स्ट रोड स्टेशनला उतरून चिंचपोकळी किंवा करी रोड गाठावं लागेल.
घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.