'ख्वाडा' चित्रपटातील अभिनेता प्रशांत इंगळेंचा आत्महत्येचा प्रयत्न

ऱाष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटात 'पांडा' ही भूमिका साकारलेल्या ३४ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय.

Updated: Jan 3, 2016, 02:12 PM IST
 'ख्वाडा' चित्रपटातील अभिनेता प्रशांत इंगळेंचा आत्महत्येचा प्रयत्न title=

मुंबई : ऱाष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटात 'पांडा' ही भूमिका साकारलेल्या ३४ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय.

प्रशांत इंगळे यांनी पांडा ही भूमिका साकारली होती. कर्जबाजारीपणामुळे इंगळे यांनी बुरशीचा नाश करणारे औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे सुदैवाने ते बचावलेत.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात इंगळे राहतात. गेल्या काही दिवसांपासून कर्जामुळे ते दबावाखाली होते. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दिली