काळा घोडा परिसरात विकेंड आर्ट गॅलरी सुरू

दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरात आजपासून विकेंड आर्ट गॅलरीची सुरूवात झाली. विविध क्षेत्रातल्या कलाकारांना आपली कला इथे सादर करता येणार आहे. 

Updated: Oct 23, 2016, 08:04 PM IST
काळा घोडा परिसरात विकेंड आर्ट गॅलरी सुरू title=

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरात आजपासून विकेंड आर्ट गॅलरीची सुरूवात झाली. विविध क्षेत्रातल्या कलाकारांना आपली कला इथे सादर करता येणार आहे. 

सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत ही गॅलरी सुरू राहणार आहे. तुम्हाला तुमची कला या ठिकाणी सादर करायची असेल, तर त्यासाठी पालिकेच्या ए वार्डातून ४०० रुपये भरून परवानगी घ्यावी लागते. याच उद्घाटन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.