www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुला नोकरी लावतो, असे सांगून एका तरूणानाने कळवा, ठाणे येथील एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही घटना २३ जानेवारी रोजी बांद्रा येथील एका झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
मुखत्यार खलीउद्दीन खान ऊर्फ समीर (२८) याने कळव्यात राहणार्या २३वर्षीय तरुणीला नोकरी देतो असे सांगून वांद्रय़ात बोलावून घेतले. तिला बेहराम पाडा झोपडपट्टीतील एका खोलीत नेले. या झोपडपट्टीतच ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पिडित तरुणीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुसान दोघांना अटक कऱण्यात आलेय.
या प्रकरणी पोलिसांनी मुखत्यारसह मकसूद अहमद राशीद शेख ऊर्फ गुड्डू (४०) आणि साजिद जाकीर अली (४०) या दोघांनाही गजाआड केले. ज्या खोलीत हा गुन्हा घडला ती मकसूदची होती. मकसूदनेच आपली खोली गुन्ह्यासाठी उपलब्ध करून दिली. मुखत्यार या तरुणीवर अत्याचार करीत होता तेव्हा मकसूद पहारा देत होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.