www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.
मात्र आजच्या सरकारला जनता जनार्दनाविषयी काहीही आस्था राहिलेली दिसत नाही, मायबाप म्हटलं जाणारं सरकार जनतेला सावत्रपणाची वागणूक देतेय.
आताच्या आघाडी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा १८२ वर्षांपूर्वी इंग्रजांनी टोल बंद केलेल्या `मुंबईचं वर्णन` या पुस्तकात आढळलेला हा संदर्भ
शीवचा पूल सन १७९७ गव्हर्नर डंकन साहेबांच्या कारकिर्दीत बांधिला. त्यास ५०,५७५ रुपये खर्च झाला. हे द्रव्य रयतेकडून उत्पन्न करून घेण्याविषयीं अशी युक्ती काढिली होती की, या पुलावरून गाड्या, घोडे, पालक्या वगैरे जाती येतील त्यांजकडून याप्रमाणें कर घ्यावा- बैलाच्या गाडीस अर्ध आणा, घोड्यास चार आणे, एका घोड्याच्या गाडीस अर्ध रुपया आणि दोन घोड्यांच्या गाडीस एक रुपया याप्रमाणें कर द्यावा पडे. या पुलाचा प्रतिवर्षी सरकार मक्ता देई व त्यापासून सालिना दहा वीस हजार रुपये उत्पन्न होत असे. परंतु अलीकडे सुमारे सन १८३१ साली जेव्हा सरकारानें पाहिले की, जें द्रव्य हा पूल बांधायास खर्च झाले होतें ते भरपाई होऊन चुकले, तेव्हा लागलेंच एका सुज्ञ परोपकारी इंग्रज कामगाराच्या सूचनेवरून हा कर घेणे बंद केले, हा सरकारचा किती उदारपणा. दुसरे सरकार असतें तर एकाएकीं हे इतकें उत्पन्न सोडून देते ना.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.