अबब! शरीरावर गोंदवले 144 ब्रँडचे टॅटू

जॅसन जॉर्ज मुंबईच्या डोंबिवलीमध्ये राहणारा 23 वर्षीय तरुण... 2 वर्षांपूर्वी कॉलेज ड्रॉप केलेल्या जॉर्जला मित्रानं सल्ला दिला की तू टॅटू गोंदवण्याला आपली हॉबी बनव. आयडिया आवडली आणि जॉर्जनं काम सुरू केलं. छंदाचं रुपांतर लहरीत झालं आणि आता त्याचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.

Updated: May 7, 2015, 12:37 PM IST
अबब! शरीरावर गोंदवले 144 ब्रँडचे टॅटू title=

मुंबई: जॅसन जॉर्ज मुंबईच्या डोंबिवलीमध्ये राहणारा 23 वर्षीय तरुण... 2 वर्षांपूर्वी कॉलेज ड्रॉप केलेल्या जॉर्जला मित्रानं सल्ला दिला की तू टॅटू गोंदवण्याला आपली हॉबी बनव. आयडिया आवडली आणि जॉर्जनं काम सुरू केलं. छंदाचं रुपांतर लहरीत झालं आणि आता त्याचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय.

जॉर्जच्या शरीरावर एकूण 200 टॅटू आहेत. यात 144 टॅटू त्यानं केवळ एका महिन्यात गोंदवले आणि म्हणून त्याचं नाव रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलंय. विशेष म्हणजे सर्व टॅटू कोणत्या ना कोणत्या ब्रांडचे आहेत. जॉर्जनं आपल्या शरीराला होर्डिंग बनवायला कसलीही कमी ठेवली नाही. आतापर्यंत यावर तीन लाख रुपये खर्च झाले आहेत. जवळपास 16 तासांहून अधिक काळ आपली पाठ, हात आणि पायांवर सुईचा त्रास त्यानं सहन केलाय. एवढंच नव्हे तर छंद असा की यासाठी त्यानं आपली फॅमिली कारही विकली.

हातावर फक्त धार्मिक टॅटू
तो सांगतो, 'मी फक्त त्याच ब्रँडचे टॅटू गोंदवतो जे मला आवडतात किंवा ज्यांचा माझ्या जीवनावर कधी ना कधी प्रभाव पडलेला असतो.' जॉर्ज आपल्या मित्रांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. कोणत्याही ब्रँडची वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याचे मित्र जॉर्जला विचारूनच घेतात. 

जॉर्ज म्हणतो, 'मी माझ्या चेहऱ्यावर कधी टॅटू गोंदवणार नाही. माझ्या हातावर फक्त धार्मिक टॅटू असतात.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.