जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातील ९ जण अडकलेत

जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 9 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. यात ग्रामविकास खात्याच्या दोन अधिका-यांचा समावेश आहे. 

Updated: Sep 9, 2014, 01:35 PM IST
जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातील ९ जण अडकलेत title=

मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 9 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. यात ग्रामविकास खात्याच्या दोन अधिका-यांचा समावेश आहे. 

बचत गटाच्या प्रदर्शनासाठी ते 4 तारखेला काश्मीरला गेले होते. श्रीनगरमध्ये हे प्रदर्शन होतं. त्यांच्याशी अद्याप कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र हे सर्वजण सुरक्षित असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.

2 सप्टेंबरपासून सुरू असलेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून मात्र कमी झालाय. मात्र आता पुढच्या 24 तासांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींची मदत. मदत आणि  बचावकार्यासाठी २० बोटी रवाना करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखीनच खराब होऊ शकते. श्रीनगरच्या लाल चौकातही सगळीकडे पाणीच पाणी आहे. जम्मूच्या आरएसपुरा भागात पुरामुळे सर्वात जास्त नुकसान झालंय. पुरामुळे अनेक लोकांनी घरांच्या छतावर आश्रय घेतलाय. याठिकाणी चीता आणि एडव्हांस लाईट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जनतेला मदत केली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.