भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार

सध्या भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. 

Updated: Feb 5, 2016, 09:51 PM IST
 भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार  title=

मुंबई : सध्या भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. 

शालेय पुस्तकांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला जात असून देशाची धर्मनिरपेक्षता यामुळं धोक्यात येण्याची शक्यता पवारांनी व्यक्त केलीय. त्यामुळं चर्चासत्र आणि लिखाणाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज पवारांनी व्यक्त केली. 

मुस्लीम द्वेष्टे म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा समाजासमोर उभी केली जात आहे. शिवरायांनी मात्र अनेक मुस्लिमांना त्यांच्या सैन्यात मोक्याच्या जागेवर नेमलं होतं असंही पवारांनी नमूद केलं. 

पवारांनी देशातील 60 पेक्षा जास्त इतिहास संशोधक आणि तज्ज्ञांची परिषद मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केली होती. पवारांचा  भाजप सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा यानिमित्तानं रंगली आहे.