अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : जगातील सर्वाधिक काळ आरमाराची शान असलेली आयएनएस विराट ही भारतीय नौदलाची आघाडीची विमानवाहु युद्धनौका अखेर पुढील वर्षी निवृत्त होणार आहे. २०१६च्या अखेरीला 'विराट'ला ताफ्यातून रिटायर करणार आहेत.
या नौकेने ५७ वर्ष ब्रिटन आणि भारत यासाठी सेवा बजावली आहे. आता या नौकेचे रुपांतर संग्रहालयात होणार की विक्रांतप्रमाणे भंगारात जाऊन तिला जलसमाधी मिळणार का यावर वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : 'आयएनएस कोची' संरक्षण दलात होतेय दाखल!
गेल्या दोन वर्षांपासून आयएनएस विराटला रिटायर करायचे की सर्व्हिसमध्ये ठेवायचे यावर समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुढील वर्षी विराटला रिटायर करणार असल्याचे समितीतील एका अधिकाऱ्याने एका मराठी वृत्तपत्राला सांगितले.
सुरूवातीला नौदलाने सर्व समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांना ही नौका घेणार असल्यासंदर्भात एक पत्र पाठविले होते. त्यापैक कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी इंटरेस्ट दाखवला होता.
आता INS विराट चे संग्रहालय करण्याच्या हालचाली सुरु
INS विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहु युद्धनौका भंगारात निघाल्याच्या अनुभवावरुन संरक्षण दलाने 2016 ला निवृत्त होणा-या INS विराट या दुस-या युद्धनौकेचे जतन करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे.
विराटचे स्मारक बनवण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांनी उत्सुकता दाखवली आहे. INS विराट ही विमानवाहु युद्धनौका एक रुपया या नाममात्र दराने सबंधित राज्याला दिली जाणार आहे. मात्र संग्रहालय करण्यासाठी संरक्षण दल कुठलीही गुंतवणूक करणार नसल्याचं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.
साधारण 300 कोटी रूपये विराटसारख्या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी लागणार आहे. तेव्हा हे संग्रहालय कसे उभारता येईल, गुंतवलेली रक्कम कशी परत मिळवता येईल याबाबत संरक्षण दल सबंधित राज्य सरकारला मार्गदर्शन करेल. मात्र INS विराट कोणत्या राज्याकडे सुपुर्द केली जाणार हे अजुन नक्की झालेले नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.