चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका

धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय. 

Updated: May 18, 2015, 10:41 PM IST
चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका title=

मुंबई: धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय. 

मुंबईतील मेटल व्यापाऱ्यांनी आता दबावाचं राजकारण सुरू केलं आहे. सरकारनं विक्रीकराच्या थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर गुजरातला स्थलांतर करण्याची धमकी व्यापाऱ्यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या आम्ही सोडवू मात्र चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही अशी भूमिका उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली आहे. 

दरम्यान, कोणत्याही व्यापारी, उद्योगानं मुंबई सोडू नये अशी शासनाची भूमिका आहे. या व्यापाऱ्यांच्याही आपण अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.