मुंबई : आपली मुलगी शीना बोरा हिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिनं काही गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यानं तिला तातडीनं तुरुंगात हलवण्यात आलं. इंद्राणीला हॉस्पीटलमध्ये भरती करव्या लागण्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिलेत.
मीडिया टायकून पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणीची प्रकृती स गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. इंद्राणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असं म्हटलं जातंय.
जे जे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीला शुक्रवारी दुपारी 2 वाजता हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं. ती तेव्हापासून बेशुद्ध अवस्थेत आहे. डॉक्टरांनी एमआरआय केलंय. तिनं काही गोळ्या घेतल्या असाव्यात असा डॉक्टरांना संशय आहे. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इंद्राणीची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
इंद्राणीचा 'गॅस्ट्रिक लेवेज' (खालेल्या वस्तू पोटांतून बाहेर काढण्याची प्रक्रिया) घेतलंय. ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलंय. तिला श्वास घेण्यासाठीही त्रास होतोय. आम्ही ऑक्सीजनचा पुरवठा केलाय, असं लहाने यांनी म्हटलंय.
43 वर्षांच्या इंद्राणीला आर्थर रोड तुरुंगातून सरकारी जे जे हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलं होतं. ती काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचं सांगण्यात येतंय.
इंद्राणी हिनं आपल्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलीची - शीना बोराची एप्रिल 2012 मध्ये हत्या केल्याचं समोर आलं होतं. 25 ऑगस्ट 2015 मध्ये इंद्राणीला अटक करण्यात आली. या प्रकरणात इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनाही अटक करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.