शेअर बाजारात तेजी

गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2013, 12:23 PM IST

www.24taas.com,मुंबई
गेले काही महिने मंदीच्या सावटाखाली असणारा शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने २०,००० हजारापर्यंत उसळी मारली. दरम्यान, आज १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले.

दोन दिवस शेअर बाजारात तेजी होती. आज सेंसेक्स १८ अंकाने खाली आला. १९,९६५.४६ वर मार्केट खुले झाले. दोन दिवसात छोट्या गुंतवणूकदारांनी घेतलेल्या शेअरची विक्री करून लाभ उठवला.
तब्बल दोन वर्षानंतर सेन्सेक्सने २०,००० पर्यंतचा आकडा गाठला आहे. सेन्सेक्स १०० अंकांनी वधारून २०,००० आणि निफ्टी ३.३५ अंकांनी वधारून ६०२७.४० वर उघडला. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी बहुचर्चित ’गार’ (जनरल अँटी अव्होयडन्स रुल्स) ची लागू करण्याची मुदत २ वर्षांने वाढवल्याची घोषणा केली. त्याचाच हा परिणाम असल्याची ही चर्चा आहे.
गुंतवणूकदारांनी पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत करत बाजारात अधिक गुंतवणूक केली. त्यामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण दिसून आलं आहे. गारची नियमावली लागू करण्याची मुदत आता १ एप्रिल २०१४ वरून वाढवून १ एप्रिल १६ करण्यात आलीय.
टीसीएस कंपनीचे शेअर्सची किंमत ही ३ टक्क्यांनी वाढून १,३७४.३५ एवढे झाली तर विप्रो कंपनीचे शेअर्स ०.६७ वाढून ४२०.७० एवढे झाले. आशियाई बाजारातील संमिश्र कलाचाही आजच्या बाजारातील सुरुवातीच्या ट्रेडवर परिणाम दिसून आला.