मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंडला यूएनने म्हटलं 'साहेब'

संयुक्त राष्ट्रने हाफिज सईदचा उल्लेख 'साहिब' असा केला आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे . एका पत्रात संयुक्त राष्ट्राने त्याचा उल्लेख साहिब असा केला आहे.

Updated: Dec 21, 2014, 11:38 PM IST
मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंडला यूएनने म्हटलं 'साहेब' title=

मुंबई : संयुक्त राष्ट्रने हाफिज सईदचा उल्लेख 'साहिब' असा केला आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे . एका पत्रात संयुक्त राष्ट्राने त्याचा उल्लेख साहिब असा केला आहे.

 
याबाबतीत भारताने यूएनला पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. भारताकडून  या उल्लेखाबाबत तीव्र शब्दात आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमधील हेरात येथे असलेल्या भारतीय दुतावासावर झालेल्या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदचा हात असल्याचा आरोप भारताने या तक्रारीत केला होता. भारताने १७ नोव्हेंबरला संयुक्त राष्ट्राकडे हाफिज सईदची तक्रार केली होती. 
 
भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्राने मान-पान दिल्याने, भारत आक्रमक झाला आहे. या तक्रारीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषद समितीचे अध्यक्ष गॅरी क्वीनलन यांनी जे स्पष्टीकरण भारताला पाठविले आहे त्यात हाफिज सईदचा उल्लेख 'साहिब' असा करण्यात आला आहे.
 
 हाफिज सईद हा मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे. सध्या तो पाकिस्तानात मोकाट आहे. भारताने पाकिस्तानकडे हाफिजला भारताकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मात्र पाकिस्तानने याप्रकरणी काहीच हलचाली केलेल्या नाहीत. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रानेही अतिरेकी सईदचा साहिब असा उल्लेख केल्याने भारत आक्रमक झाला आहे.

 हाफिज सईदवर संयुक्त राष्ट्रानेच डिसेंबर 2008 मध्ये जमात-उद- दावा संघटनेला अतिरेकी घोषित केलं आहे. याशिवाय हाफिज सईदवरही संयुक्त राष्ट्राने प्रतिबंध आणला आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.